शिवसेना - भाजप युतीबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान

Shiv Sena - BJP Alliance News : शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारणही तसेच आहे.  

Updated: Jan 4, 2022, 03:24 PM IST
शिवसेना - भाजप युतीबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Shiv Sena - BJP Alliance News : शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारणही तसेच आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी धक्कादायक विधान केले. गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवल्यास सेना आणि भाजप एकत्र येतील, असा दावा केलाय. (Shiv Sena Minister Abdul Sattar's big statement about Shiv Sena - BJP alliance)

नितीन गडकरी यांनी राज्यात लक्ष घातले तर शिवसेना भाजप एकत्र येईल. शिवसेना-भाजप यांना एकत्र आणण्याची चावी गडकरी यांच्याकडे आहे, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. सत्तार यांनी आज मराठवाड्यातल्या कामांसंदर्भात दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. त्याचबरोबर पक्षाचे नेतृत्व रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले तरी कोणाची हरकत नसेल, असेही सत्तार म्हणालेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध अतिशय चांगले आहेत.  नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर सेना भाजप एकत्र येईल. गडकरी राज्यात आले तर सेना भाजपची मने जुळतील, असे वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.