अजित पवारांच्या गळाला शिवसेनेचे आमदार?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे चार आमदार... हे चित्र पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Updated: Oct 31, 2017, 08:57 AM IST
अजित पवारांच्या गळाला शिवसेनेचे आमदार? title=

इंदापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे चार आमदार... हे चित्र पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

चिपळूणचे सदानंद चव्हाण, राजापूरचे राजन साळवी, करमाळ्याचे नारायण पाटील आणि खानापूर विट्याचे अनिल बाबर.... शिवसेनेचे हे चार आमदार अजित पवारांच्या गळाला लागले की काय? असंही तुम्हाला वाटेल. पण तसं काही नाहीये.

त्याचं झालं असं की, इंदापुर तालुक्यामध्ये अर्जुन देसाई यांच्या आधुनिक डेअरीचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे येणार होते. पण ते दोन्ही नेते वेळेवर आले नाहीत. तेव्हा अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना आपल्या गाडीत बसवलं आणि डेअरीचा सगळा परिसर त्यांना फिरवून दाखवला.

विशेष म्हणजे यापैकी तीन शिवसेना आमदार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आलेत. त्यामुळे अजित पवारांची ही साखर पेरणी भविष्यात उपयोगी पडेल का, याची उत्सुकता आहे.