रत्नागिरीतील आर्चरी स्पर्धेला गोलबोट, एका स्पर्धकाला बाण लागला

येथे सुरु झालेल्या आर्चरी स्पर्धेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे. स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरुन जाणाऱ्या पुण्याच्या नॅशनल खेळाडू जुई ढगे हिच्या हाताला लागला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2017, 08:08 PM IST
रत्नागिरीतील आर्चरी स्पर्धेला गोलबोट, एका स्पर्धकाला बाण लागला title=

रत्नागिरी : येथे सुरु झालेल्या आर्चरी स्पर्धेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे. स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरुन जाणाऱ्या पुण्याच्या नॅशनल खेळाडू जुई ढगे हिच्या हाताला लागला.

जखमीवर वालावलकर रुग्णालयात उपचार

यात जुई ढगे जखमी झाली आहे. तिच्यावर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार चालू आहेत. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोशिएशन यांच्या विद्यमानं या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केले.

सुरक्षिता खबरदारीकडे दुर्लक्ष?

यात अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा चालू होण्यापूर्वी सुरक्षा असणे आवश्यक आहे. मात्र ही सुरक्षा नसल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोलले जात आहे.