close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खासदार सनी देओलनं नागपुरात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहकारी संघटनांनी महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये अखंड भारत दिवस साजरा केला

Updated: Aug 14, 2019, 09:27 PM IST
खासदार सनी देओलनं नागपुरात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

नागपूर : खासदार सनी देओल यांनी नागपुरात रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात आज आद्य सरसंघचालक डॉ डेगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही होते. सनी देओल यांनी समाधींना माल्यार्पण केलं. त्यानंतर स्मृतीमंदिर परिसरात माहितीही घेतली तसंच त्याठिकाणच्या नोंद वहित अभिप्रायही नोंदवला. सुमारे २० मिनिटे सनी  देओल स्मृतीमंदिर परिसरात होते. यावेळी संघाच्या काही पदाधिका-यांसोबत त्यांनी चर्चाही केली. 

स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहकारी संघटनांनी महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये अखंड भारत दिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी गुरुदासपूरहून भाजपाचे खासदार सनी देओल यांनी नितीन गडकरींसोबत या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

यावेळी सनी देओल यांनी 'भारत माता की जय' अशा घोषणाही दिल्या.