ठाणे : Supriya Sule on Income Tax Department Raid : महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे कधी झूकला नाही आणि झुकणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. नवरात्र निमित्त सुप्रिया सुळे या आज ठाण्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आल्या होत्या.
कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेली मंदिरे प्रदीर्घ काळानंतर काल घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आज पाचपाखडी परिसरातील देवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. माझी आई वर्षातून एकदाच नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायची त्यामुळे नवरात्र म्हणजेच माझी आई असल्याचे भावुक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
शारदिय नवरात्र उत्सव
शारदिय नवरात्र उत्सव निमित्त गणेशवाडी, पांचपाखाडी, ठाणे येथील आई श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, लोकसभा खासदार सन्मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते आई श्री तुळजाभवानी देवीची महाआरती.@supriya_sule @RutaSamant @NCPspeaks pic.twitter.com/YwTuQaPXsX
— NCP THANE (@thanespeak) October 8, 2021
सध्या ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर पवार कुटुंबीय असल्याने पवार कुटुंबातील अनेक सदस्यांच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. संघर्ष करणे ही पवार परिवाराची खासियत आहे, आम्ही कधी सुडाचे राजकरण केले नाही आणि करणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
महाविकास आघाडीने अखेर मंदिर उघडण्याची परवानगी दिल्याने सर्व भाविकांना अतिशय आनंद झाला असून त्याबद्दल त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेक, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.