घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.   

Updated: Jul 16, 2020, 08:23 AM IST
घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या title=

सोलापूर : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयातील बेडची देखील कमतरता भासत आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवस घरातच होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जेवढी स्वतंत्र शौचालये आणि खोल्या असतील तेवढ्याच व्यक्तींना घरात क्वारंटाइन करण्यात येणार आहे. घरातील बाकी सदस्यांना विलगीकरण केंद्रत ठेवण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी सोलापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे नियमांची नियमावली देखील जाहीर केली आहे. 

नियमावलीमध्ये कोरोना रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवसांसाठी होम क्वारंटाइन राहवं लागणार आहे. घरामध्ये स्वतंत्र खोल्या आणि शौचालयं नसल्यास त्या व्यक्तींनी विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. नेहमी सर्जीकल मास्कचा वापर करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी जणतेला दिल्या आहेत. 

त्याचप्रमाणे कोरोनासंबंधीक लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या कोविड कंट्रोल रूमसोबत संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याचवेळी मुंबईतील आकडा कमी होताना दिसत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे.