हातावरच्या रेषा नाही तर आई-बापच पोराचं नशिब घडवतात; बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलाची कामगिरी पाहून असच म्हणालं

तू तुला पाहिजे ते शिक्षण घे, आम्ही तुला काहीच कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच दीपकला प्रोत्साहित केले. दीपकने देखील आई-बापाच्या कष्टाची जाण ठेवून खूप मेहनत घेतली आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. 

Updated: Nov 30, 2022, 08:15 PM IST
हातावरच्या रेषा नाही तर आई-बापच पोराचं नशिब घडवतात; बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलाची कामगिरी पाहून असच म्हणालं title=

Trending News : हातावरच्या रेषा नाही तर आई-बापच पोराचं नशिब घडवतात हे वाशिम मधील एका  गरीब आणि मेहनती पित्याने सिद्ध करुन दाखवले आहे. बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलगा मोठा अधिकारी बनला आहे. रामभाऊ खंदारे(Rambhau Khandare) असे या पित्याचे नाव आहे. बुट पॉलिश  मिळणाऱ्या पैशातून संसारा रहाटगाडा हाकत असतानाच रामभाऊंनी मुलाला उच्च शिक्षण देऊन त्याला मोठ्ठा साहेब बनवण्याचं पाहिले. रामभाऊंनी नुसतं स्वप्नच पाहिले नाही तर आपली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने ते पूर्ण देखील करुन दाखवले. विशेष रामभाऊंच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत(Maharashtra Public Service Commission exam ) यशस्वी कामगिरी करत बापाच्या मेहनतीचं चीज केलं.  सध्या रामभाऊ आणि त्यांचा मुलगा चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे.  

रामभाऊंचा मुलगा दीपक याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दीपकची थेट  विक्रीकर निरीक्षक या पदावर  नियुक्ती झाली आहे. अथक परिश्रम आणि बापाची जिद्द याच्या बळावरच दीपकने स्वत: आपलं नशिब घडवलं आहे. 

वाशिममध्ये राहणाऱ्या रामभाऊ खंदारे यांचेकडे शेती नाही. लोकांच्या फाटक्या चपला शिवून आणि बुट पॉलिश करून ते कुटूंबाचा आजही चरितार्थ चालवतात. खंदारे दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. रामभाऊंच्या पत्नी तुळसाबाई या देखील घरातील काम सांभाळून तेलाच्या घाण्यात काम करुन संसाराला हातभार लावत आहेत.

मुलाला चांगले शिक्षण देऊन त्यांना उच्च पदस्थ नोकरी मिळावी असं स्वप्न त्यांनी पाहिले. लोकांचे बुट पॉलिश करता करता रामभाऊंच्या हातावरच्या रेषा पुसल्या गेल्या मात्र, त्यांनी मुलाच नशिब घडवलं.  परिस्थितीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही मात्र, आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठ्या पदावर नोकरी करावी यासाठी रामभाऊ आणि त्यांच्या पत्नीने जीवतोड मेहनत घेतली आणि मुलाला शिकवले. तू तुला पाहिजे ते शिक्षण घे, आम्ही तुला काहीच कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच दीपकला प्रोत्साहित केले. दीपकने देखील आई-बापाच्या कष्टाची जाण ठेवून खूप मेहनत घेतली आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे.