सातारा : महाबळेश्वर येथे सेल्फी काढण्याच्या नादात असणारा पर्यटक दरीत कोसळला. लॉडविक पॉईंटवर १०० फुटावर हा पर्यटक अडकून जखमी झाला आहे. महाबळेश्वरमधील ट्रेकर्सच्या मदतीने पर्यटकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. येथील अनेक पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड दिसून येत आहे. निसर्ग पाहून अनेक पर्यटक भरावून जातात. त्यासाठी ते सेल्फी काढण्यासाठी पुढे सरसवतात. असाच प्रयत्न एका पर्यटकाने केला मात्र, तो त्याच्या अंगलट आला आणि तो दरीत कोसळला.
सध्या अनेकांच्या हातात स्मार्ट फोन दिसून येतो. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा त्यांना मोह आवरता येत नाही. मात्र, हाच मोह अनेकदा जिवावर बेतल्याच्या घटना घडल्यात. परंतु यातून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून दिसून येत आहे. पर्यटनस्थळी किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्याच येते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडतात. त्यामुळे सेल्फीच्या क्रेझपायी या अपघातानंतरही सर्वांना अजून शहाणपण आलेले नाही. महाबळेश्वर येथे सेल्फीने पर्यटक दरीत कोसळ्याची घटना घडली. या पर्यटकाला वाचविण्यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत.
थंडीचा मोसम सुरु आहे. महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक लॉडविक पाईंटवर सेल्फी घेत असताना १०० फूट खोल दरीत कोसळला. त्यामुळे येथे जमलेल्या पर्यटकांमध्ये धावाधाव सुरु झाली. त्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. याची माहिती मिळताच ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून पर्यटकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोसळल्या पर्यटकाबाबत कोणताही माहिती हाती आलेली नाही.