वाहतूक नियमांचे उल्लंघन, दंड केल्याने महिलेने केला जोरदार राडा

वाहतूक पोलिसांनी (Traffic Police ) दंड (fine)केल्याने महिलेने प्रचंड राडा (woman Rada) केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

Updated: Mar 19, 2021, 01:57 PM IST
वाहतूक नियमांचे उल्लंघन, दंड केल्याने महिलेने केला जोरदार राडा  title=
संग्रहित छाया

नागपूर : वाहतूक पोलिसांनी (Traffic Police ) दंड (fine)केल्याने महिलेने प्रचंड राडा (woman Rada) केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी मग महिलेने गाडीवरून पडल्याचा बहाणा केला. नंतर मात्र पेट्रोल टाकून जाळून घेण्याची धमकीही दिली. पण नियमांचं उल्लंघन ( Violation of traffic rules) करत असल्यानं कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितले. तर मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात नेत होते आणि पोलिसांनी अडवले, असा आरोप महिलेने केला.

वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याने चलन कारवाई केली. त्यानंत या महिलने जोरदार गोंधळ घातला. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहरातील इतवारीच्या शहीद चौका जवळ ही घटना घडली.  ही महिला मुलीला घेऊन दुचाकीने डबलसीट निघाली होती. शहीद चौकाजवळ  वाहतूक पोलिसांनी  थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांपासून वाचण्याच्या प्रयत्नात आपण पडल्याचा आरोप ती महिललेने व्हिडिओत केला आहे. 

दरम्यान पोलिसांनी कारवाईला सुरू करताच, या महिलेने तिथे राडा घातला. लॉकडाऊन (lockdown) दरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आपण थांबवत असल्याचे पोलीस तिला सांगत होते. मात्र, ही महिला ऐकून घेण्यास तयार नव्हती. या महिलेने कारवाईस विरोध केल्यानंतर पोलीस महिला कर्मचाऱ्याने तिच्या दुचाकीची चावी काढली. त्यानंतर ती महिला अधिक आक्रमक झाली. वाहनातून पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करून स्वत:ला जाळून घेण्याची धमकी देऊ लागली. आपण मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना पोलिसांनी विनाकारण त्रास दिल्याचा या महिलेचा आरोप आहे.