बीड : जिल्ह्यातील ११ तूर खरेदी केंद्र बंद असल्याबाबतचे वृत्त झी २४ तास वरुन प्रसारित झाल्यानंतर सहकार आणि पणन विभाग खडबडून जागा झाला. गेवराई येथील एका गोडाऊनमध्ये घाई गडबडीत उद्घाटनचा फार्स करण्यात आला.
कुठलीही पूर्वतयारी आणि सूचना न देता केवळ काटापुजन करायचे याच उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आल्याने या कार्यक्रमाकडे शेतकरी फिरकलेच नाहीत.
एक दोन शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी आणून खरेदी करून खरेदी केंद्र सुरु झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडने केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात मात्र खरेदी अद्यापही सुरूच झालेली नाही.