नाशिक : कोरोना विषाणू येवल्यात दाखल अशी अफवा दोन तरुणांनी पसरवली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोरोनाची अफवा पसणाऱ्या या दोन तरुणांना येवला तालुका पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्ह्यातील कोरोना विषयी अफवा असणारा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. याआधी बीड आणि पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
#BreakingNews । कोरोना विषाणू येवल्यात दाखल अशी अफवा पसणाऱ्या दोन तरुणांना येवला तालुका पोलिसांनी केली अटक । नाशिक जिल्ह्यातील कोरोना विषयी अफवा असणारा पहिला गुन्हा दाखल#coronavirus #CoronavirusOutbreak#CoronaVirusUpdates @ashish_jadhao pic.twitter.com/10rnUNss3G
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 17, 2020
बीड येथे कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आष्टीमध्ये कोरोणाचा रुग्ण आढळला आहे, व्हाट्सअपला स्टेटस ठेवणाऱ्या आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या अशा दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तसेच पुण्यातही असाच गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती दिली होती. या माहितीची पडताळणी केली. यावेळी ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यामुळे अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
0