बीड : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये येताच हेलिपॅडवरून थेट तळेगाव भागातील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी त्यांना यावेळी आसूड भेट देत भाजप सरकारवर रोष व्यक्त केला.
उद्धव ठाकरे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने बीड येथे दाखल झाले. ते थेट दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तळेगाव भागातील सखाराम मस्के यांच्या कपाशीच्या शेतात पोहचले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. किती खर्च केला, उत्पन्न किती मिळाले, पाण्याची काय व्यवस्था आदी विषयावर चर्चा करून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.