पुण्यातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची आहेत.  त्यासाठी महापालिकेनं विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. 

Updated: Jan 19, 2018, 11:01 PM IST
पुण्यातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत title=

पुणे : अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची आहेत.  त्यासाठी महापालिकेनं विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. 

या दिवसापासून अर्ज करा

सोमवारपासून अनधिकृत बांधकामधारकांना अर्ज करता येणार आहे. पुढील सहा महिने अर्ज करण्याची मुदत आहे. आर्कीटेक्टमार्फत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.  विशेष म्हणजे, फायर एनओसी असेल तर, रूफ टॉपवरील अनधिकृत बांधकामं किंवा हॉटेल देखील अधिकृत होणार आहेत. 

७० हजार बांधकामे अनधिकृत

पुणे शहरात जवळपास सत्तर हजार अनधिकृत बांधकामं आहेत. पुढील सहा महिने हि बांधकामं अधिकृत करण्याची संधी मिळणार आहे. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिका दंड आकारणार आहे. त्यातून दोनशे कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.