Pune Porsche Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे. अल्पवयीन मुलाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 50 वर्षीय हा कार चालक आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. प्रत्यक्ष अपघात (Pune Porsche Accident) घडला त्यावेळी हा चालक गाडीमध्ये होता. तर अप्लवयीन मुलानं 2 जणांना उडवलं होतं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता देशभरात या मुद्द्यावरून रान पेटलंय. अशातच आता पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि नेत्यांन थेट इशारा दिलाय.
काय म्हणाले वसंत मोरे?
कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा सवाल वसंत मोरे यांनी विचारलाय. कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय.
ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावं. सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावं. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते, असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? असा खोचक सवाल देखील वसंत मोरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठं हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असं गंभीर इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते.
नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ?
ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील pic.twitter.com/Vk4gcT73LK
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 23, 2024