Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास ...कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा...

Viral video: लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हणतात. सध्या असाच एक निरागसकता दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होतं आहे. खास कोल्हापुरी ठसक्यात ही चिमुरडी आपल्याच शिक्षिकेला कशी दमटावतेय पाहा. 

Updated: Feb 6, 2023, 06:28 PM IST
Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास ...कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा... title=

Viral Video : सोशल मीडियावर  (social media) दिवसाला असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतं असतात. त्यातले काहीच व्हिडीओ आपण आवर्जून पाहतो, ठराविक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. व्हायरल होणारे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारातले असतात. 
काही व्हिडीओ सापाचे असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. कधी कोणत्या लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी कोणाच्या डान्सचा व्हिडीओ भाव खाऊन जातो. (viral video of small kolhapuri girl)

एका रात्रीत व्हायरल व्हिडीओमुळे स्टार झालेली बरीच मंडळी आहेत. काहींना व्हायरल व्हिडीओमुळे प्रसिद्धी पैसे फेम सर्वकाही मिळालं. साध्य असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला अभ्यास करायचा नाहीये म्हणून, गयावया करताना दिसत आहे. तसं पाहिलं तर,बालपण हे निरागस असतं. लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हणतात कारण ते इतके निस्वार्थी आणि निरागस असतात, त्यांच्या वागण्यात , चालण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा असतो. 

लहानपणी अभ्यास करायला कोणाला आवडतं? अभ्यास नको म्हणून आपण अनेक पळवाटा शोधतो, गयावया करतो. व्हायरल (viral video) होतं असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता कोल्हापुरी भाषेत एक चिमुकली आणि तिच्या शिक्षिकेचा संवाद चाललेला आहे.  तिची टीचर तिला अभ्यास पूर्ण करायला सांगतेय तर ही पोट्टी मात्र डोक्याला ताप देऊ नको म्हणत अगदी गोड भाषेत तिला कंटाळा आलाय म्हणून सांगतेय. हा व्हिडीओ (trending video) जितक्यांदा पाहू तेवढा कमी वाटतोय कारण आहे या लहानगीची खास कोल्हापुरी भाषा आणि त्यातलं तिचं निरागस वक्तव्य.  (innocent viral video)

सध्या सोशल मीडियावर अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे, लोक या व्हिडिओवर कॉमेंट्स करत आहेत. 

 

नुकतेच काही दिवसांपूर्वी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमात 'लोकशाही' (Lokshahi Speech by School Boy ) या विषयावर भाषण देणारा लहान एक लहान  मुलगा हिरो बनला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून सगळेच जण त्याचे फॅन बनले आहे.

त्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रातोरात हा चिमुकला स्टार झाला , अनेक मंत्री आमदार खासदारांनी त्याला गाठलं आणि त्याला बक्षिससुद्धा दिलं होतं.