राज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार

दिल्लीत भाजप नेत्यांची  भेट घेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Updated: Mar 20, 2024, 03:32 PM IST
राज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार  title=

MNS BJP Aalince : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीमुळे राजकारणात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. रीाज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. यांच्यात बैठक देखील झाली.  अमित शाहांसोबतच्या बैठकीला विनोद तावडेंसह अमित ठाकरेही उपस्थित होते. यामुळे  राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दिल्लीतील राजकीय बैठकीनंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.  

दिल्लीतील राजकीय बैठकीनंतर आता राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेबाबत चर्चेची शक्यता आहे. दोन जागा मनसेला सोडण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच सभा कुठे घ्यायच्या याबाबतही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदींना पंतप्रधान करणं आणि महायुतीला मजबूत करणं हे सगळ्यांचं लक्ष्य आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. मतभेद झाले असतील तर दूर झाले पाहिजेत...एक दोन दिवसांत शाहा आणि राज भेटीबाबतही सर्व कळेल अशी माहिती फडणवीसांनी दिली.

राज ठाकरे-अमित शहा भेटीनं त्यांच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खूश नाहीत - रोहित पवार

मुळात दिल्लीला जाणं हेच आम्हाला पटत नाही. तिथं गेल्यानं लोकांच्या मनात एक वेगळी भावना तयार होते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिलीय. राज ठाकरे-अमित शहा भेटीनं त्यांच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खूश नाहीत असही रोहित पवारांनी म्हंटलंय. 

व्यंगचित्र ट्विट करून राज ठाकरे आणि भाजपला डिवचण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचंच जुनं व्यंगचित्र ट्विट करून राज ठाकरे आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तसंच अलीकडच्या काळातील आपल्याला सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र असल्याचं टोलाही त्यांनी ट्विटरवरून लगावलाय. भाजप, फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंनाही राऊतांनी टॅग केलंय. त्यामुळे आता मनसे आणि भाजप याला कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर दणार याची उत्सुकता आहे.