Mumbai Landowners: Dream City ... सपनों का शहर... अशी मुंबईची ओळख. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा बोलबाला जगभरात आहे. भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतात. सध्याच्या घडीला मुंबईत छोटासा तुकडा खरेदी करणे पण तुम्हाला माहित आहे का मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन. जाणून घेऊया.
मुंबई शहर हे भारताचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. मुंबईत जमीनीचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईतील जमिनीचा मोठा भाग काही जमीनदार आणि खाजगी ट्रस्टच्या मालकीचा असल्याचे एका अहवालातुन समोर आले आहे, मुंबईतील 10% पेक्षा जास्त जमीन काही खास जमीन मालकांच्या मालकीची आहे. यापैकी बऱ्याच जमीन मालकांकडे पिढ्यानपिढ्या आलेल्या जमिनी आहेत. या जमीनी कौटुंबिक मालमत्ता तसेच वारशाने मिळालेल्या आहे. तर काही सरकारने वेळोवेळी अधिग्रहित केल्या आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) एक सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील एकूण जमिनीपैकी सुमारे 20% जमीन काही विशिष्ट जमीन मालकांच्या मालकीच्या आहेत. या सर्वेक्षणानुसार, मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये 1 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहेत. त्यापैकी 34,000 एकर जमीन राहण्यायोग्य आहे. या 34,000 एकरांपैकी सुमारे 20% जमीनीची मालकी ही 9 खाजगी संस्था, कुटुंबे आणि काही खाजगी ट्रस्ट यांच्याकडे आहे. या 20 टक्क्यांपैकी निम्म्याहून अधिक जमीन मुंबईतील विक्रोळी भागातील गोदरेज कुटुंबाची आहे.
गोदरेज परिवार मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार असल्याचे समजते. गोदरेज प्रॉपर्टीजच्या नावावर विक्रोळी परिसरात 3,400 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) लगत हा जमीनीचा मोठा तुकडा आहे. साबणापासून ते गृहोपयोगी वस्तू तसेच रिअल इस्टेटपर्यंत गोदरेज समूहाचा व्यवसाय विस्तारलेला आहे. यांनी नुकताच दोन भागांमध्ये विभागण्याचा करार केला. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर गोदरेज यांनी गोदरेज इंडस्ट्रीज राखून ठेवली, तर त्यांचे चुलत भाऊ जमशेद आणि स्मिता यांनी मुंबईत अनलिस्टेड गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्या उपकंपन्यांसह प्रमुख मालमत्ता वारशाने मिळवल्या आहेत.
जमीनीच्या मालकीच्या बाबतीत FE दिनशॉ ट्रस्ट दुसऱ्या स्थानी आहे. FE दिनशॉ ट्रस्ट मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची जमीन मालक आहे. दिनशॉ ट्रस्टच्या नानावर 683 एकर जमीन आहे. मालाड आणि आसपासच्या परिसरात FE दिनशॉ ट्रस्टची जमीन आहे. EF दिनशॉ यांचा 1936 मध्ये मृत्यू झाला. ते पारशी वकील आणि जमीनदार होते.
प्रतापसिंह वल्लभदास सुर्जी यांचे कुटुंब मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जमीन मालक आहेत. मुंबईतील भांडुप परिसरात आणि आसपासच्या परिसरात त्यांच्या नावावर 647 एकर जमीन आहे.ॉ
जीजीभॉय अर्देशीर ट्रस्ट चौथ्या स्थानी आहे. यांच्या नावे मुंबईच्या चेंबूर परिसरात 508 एकर जमीन आहे.
ए.एच. वाडिया ट्रस्ट यांच्या नावे कुर्ला परिसरात 361 एकर जमीन आहे.
बायरामजी जीजीभॉय ट्रस्टच्या नावावर मुंबईच्या विविध भागात 269 एकर जमीन आहे. सर बायरामजी जीजीभॉय यांना 1830 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून 12,000 एकर जमीन मिळाली होती.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.