युट्यूबरने केली प्रेयसीची हत्या, व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करत म्हणाला, Yes I Killed!

आरोपीने पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करत ही माहिती दिली आहे

Updated: Aug 18, 2022, 05:45 PM IST
युट्यूबरने केली प्रेयसीची हत्या, व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करत म्हणाला, Yes I Killed! title=

औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका युट्युबरने (YouTuber) आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने गळा चिरुन मैत्रिणीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे (YouTuber killed his girlfriend). सौरभ लाखे असे मारेकऱ्याचे नाव आहे. 

या युट्यूबरने खून केल्यानंतर तीन दिवस मैत्रिणीचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मारेकरी सौरभ लाखे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. सौरभ हा वैजापूर तालुक्यातील शिरूरमध्ये गावात राहतो आणि एका यूट्यूब चॅनलवर काम करतो. आरोपी सौरभ विवाहित आहे. मृत तरुणी एमपीएससी-यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जालना जिल्ह्यातून औरंगाबाद येथे राहण्यासाठी आली होती. दरम्यान, त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

कसा झाला खुलासा?
आरोपी तरुणीचा मृतदेह खोलीतून बाहेर काढल्यावर या हत्येची बाब समोर आली. आरोपी सौरभने चारचाकी घेऊन मृतदेह पोत्यात टाकला, मात्र घाबरून त्याने खोलीचा दरवाजा उघडा सोडला. दरम्यान, शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, जमिनीवर रक्ताच्या खुणा होत्या. त्यानंतर याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी आला असता तेथे मोठ्या प्रमाणात माशा होत्या. तसेच आरोपीवर संशय आल्याने त्याला थांबवून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने नीट उत्तर दिले नाही. 

शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खुनाची घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असावी. कारण लोकांनी शेवटच्या वेळी मृत तरुणीला 15 ऑगस्ट रोजी पाहिले होते.

माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीनेच हा खून आपणच केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांसमोर दिली. आरोपीने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पिशवीत भरले होते.

 दरम्यान, आरोपीने पत्रकार आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘येस आय किल्ड’असेही पोस्ट केले होते. पोलिसांनी यूट्यूबर सौरभला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठ घाटी रुग्णालयात पाठवला आहे. सध्या पोलीस हत्येमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.