शेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना

कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या या मायलेकराला कल्पना देखील नव्हती हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास आहे. आई आणि मुलाचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 16, 2023, 06:56 PM IST
शेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना title=

Latur Accident : जन्म आणि मृत्यू कुणाच्याच हातात नाही. आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. लातूरमध्ये ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. वाहन अपघातात या माय लेकाचा मृत्यू झाला आहे. लातूर - बाबळगाव रस्त्यावर  हा भीषण अपघात झाला. अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे (Latur Accident ).

शांताबाईं राऊत आणी त्याचा मुलगा अविनाश राऊत अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेजण बाईकवरुन  लातूर - बाबळगाव रस्त्यावरून जात होते. यावेळी यांच्या बाईकला टेंम्पोने धडक दिली. या अपघातात शांताबाई राऊत यांचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बुलढाण्यातील राजुर घाटातही भीषण अपघात झाला. एसटी बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला..ट्रॅव्हल्सनं एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात 5 जण प्रवासी जखमी झाले आहेत. या दोन्ही बस बुलढाण्यातून मलकापूरकडे जात होत्या.

एसटी बस आणि बोलेरो पिकअपचा अपघात 

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कासोळा ते पिंपळगाव सूतगिरणी मार्गावर एसटी बस आणि बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो वाहन चालक जागीच ठार झाला. बीड वरून किनवटकडे एसटी बस जात असताना महिंद्रा बोलेरो पिकअपशी जोरदार धडक झाली. अपघाताचे वृत्त समजताच पुसद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घनास्थळी दाखल झाले.  बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ट्रकच्या धडकेत महिला ठार

वडाळा गावातील गॅस गोदामालगत भरधाव वेगाने येणाऱ्या एका अवजड ट्रकने एका दुचाकी स्वार महिलेस चिरडले. या अपघतात महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त हो आहे. या ठिकाणी छोटे-मोठे अपघात कायम होत असतात. वडाळा गाव रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल यावेळी नागरिकांकडून केला जात आहे.

नाशिक पुणे महामार्गावर वडाळा गावातून मुंबई महामार्गाकडे अवजड ट्रक भरधाव वेगाने जात असताना दुचाकी ला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने महिलेचा मृत्यू झाला. आम्रपाली डेंगळे असं मृत झालेल्या महिलेच नाव असून अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर परिसरात गर्दी जमली होती. यानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमा होत पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.