मुंबई : २३ अतिधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करून त्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई महापालिकेने २०१४ साली सुमारे १२०० धोकादायक इमारतींची यादी महापालिकेने न्यायालयाला दिली होती. २०१७ साली भेंडीबाजारात इमारत पडल्यानंतर न्यायालयाने अतिधोकादायक इमारतींची यादी सादर करण्यास सांगितले आहे.
२०१९च्या पावसाळ्यापूर्वी ४९९ इमारतींची यादी तयार करण्यात आली. या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. याविरोधात २३ इमारतींच्या मालकांनी अपिल केले होते. मात्र डोंगरीमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर न्यायालयाने यावर तातडीनं सुनावणी घेत या सर्व इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. यावर आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.