मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या फोननंतर फडणवीस म्हणाले, मी घरीच आहे...

Devendra fadnavis Inquiry : कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.  

Updated: Mar 12, 2022, 07:12 PM IST
 मुंबई सहपोलीस आयुक्तांच्या फोननंतर फडणवीस म्हणाले, मी घरीच आहे...  title=

मुंबई : Devendra fadnavis Inquiry : कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. फडवणीस हे बीकेसी येथील पोलीस ठाण्यात जाणार होते. त्यांनी तसे जाहीर केले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी घरी जाऊन चौकशी करणार आहेत. सहपोलीस आयुक्त यांनी फडणवीस यांना कॉल केला. त्यानंतर फडणवीस यांनी सांगितले, मी दिवसभर घरीच आहे. तुम्ही केव्हाही या. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. 

Devendra fadnavis Inquiry : कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना बजावली होती. मात्र, यानिमित्ताने फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपने ठरवले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार चिन्हे होती. मात्र, पोलीस फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांना गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त  यांनी फोन केला होता.  तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ, असे सांगितले अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असे फडणवीस यांनी ट्विट केलेय.