मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्ण संख्या 18 ते 20 हजाराने वाढत आहे. राज्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांवर पोहचला आहे. रविवारीही राज्यात 22 हजार 543 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 11 हजार 549 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत 10 लाख 60 हजार 308 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 7 लाख 40 हजार 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 69.8 टक्के झालं आहे.
Maharashtra reports 22,543 new #COVID19 cases, 11,549 discharges and 416 deaths today. The total number of cases in the state rises to 10,60,308 including 7,40,061 recoveries and 2,90,344 active cases: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/2P1L5t54QC
— ANI (@ANI) September 13, 2020
सध्या राज्यात 2 लाख 90 हजार 344 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 29 हजार 531 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.79 टक्के इतका आहे.
मुंबईत आज दिवसभरात 2085 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 41 जण दगावले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 69 हजार 693 इतका झाला आहे.
2,085 new #COVID19 cases & 41 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases increases to 1,69,693 in Mumbai, including 30,271 active cases, 1,30,918 recovered cases & 8,147 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Maharashtra pic.twitter.com/kZNOq6nYrB
— ANI (@ANI) September 13, 2020
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 16,83,770 जण होम क्वारंटाईन असून 37,294 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 52,53,676 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 10,60,308 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.