मुंबई : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशन जवळच्या झोपडपट्टीला आज दुपारी भीषण आग लागली.
अनधिकृत झोपड्यांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू असताना ही दुर्घटना घडली. वांद्रे पूर्वच्या स्टेशनवरील तिकीट खिडकीखाली असलेल्या झोपड्यांवर कारवाई करताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळं तिकिटी खिडकीलाच आग लागली.
त्यानंतर ही आग परसत गेली... आणि जवळची झोपडपट्टीही आगीच्या विळख्यात सापडली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीनं प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान अरविंद घाडगे जखमी झाले. त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
तसंच आगीमुळं हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.