मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत शिवसेनेला जबरदस्त आव्हान दिलंय.
मुंबई महापौर निवडीच्या दिवशी भाजपकडं बहुमत असूनही आम्ही आमचा महापौर बसवला नाही... आजही आम्ही ठरवलं तर २४ तासात मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो, असा ठोस दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
राज्यातील भाजप सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले.