राज्यात भाजप सरकार : शिवसेना-काँग्रेसने राणे यांचा दावा फेटाळून लावला

BJP government in Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दावा शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) दोन पक्षांनी फेटाळून लावला आहे.  

Updated: Nov 26, 2021, 03:31 PM IST
राज्यात भाजप सरकार : शिवसेना-काँग्रेसने राणे यांचा दावा फेटाळून लावला title=
संग्रहित छाया

मुंबई : BJP government in Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा दावा शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) दोन पक्षांनी फेटाळून लावला आहे. राणे यांना भान नाही. ते वाटेल ते वक्तव्य करत आहेत. त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य असेले तरी त्यांनी त्यांचे भान ठेवलेले नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर सरकार संख्याबळावर चालते. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण बहुमत आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. (Shiv Sena-Congress rejects Narayan Rane's claim)

आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी सरकार पाडण्याचा दावा फेटाळला

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा फेटाळून लावला आहे. राणे यांनी म्हटले आहे की, मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. लवकरच चांगले बदल दिसून येतील. आमचे सीक्रेट आहे, असे राणे म्हणाले. त्याला आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. अनिल परब म्हणाले की, नारायण राणे यांच्या भाषणामुळे सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालते. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणतेही विधान करताना विश्वासार्हता वाटली पाहिजे. मात्र, जे वक्तव्य केले आहे. त्याचे त्यांना भान नाही. त्यामुळे कोणी काय बोलतो हे महत्वाचे नाही. सरकार पाच वर्षे चालणार, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत 

गुरुवारी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्राबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएल संतोष यांच्यात दिल्लीत बैठक झाली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यानी सरकार बदलण्याच्या स्फोटक वक्तव्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राणे यांनी राजस्थानमधील जयपूर येथे सांगितले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर तेथे बदल दिसतील.

महाराष्ट्रातील वातावरणाबाबत राणे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे असे वातावरण निर्माण केले जाते. मात्र मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल. यानंतर अपेक्षित बदल दिसून येईल. पुढे राणे म्हणाले की, सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे गुपित आहे.