NCP : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक?

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Poitical) आणखी एक भूकंप होणाराय. राष्ट्रवादीच्या (Ncp) एका बड्या नेत्याला लवकरच अटक होणाराय.  

Updated: Aug 17, 2022, 11:01 PM IST
NCP : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक? title=

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Poitical) आणखी एक भूकंप होणाराय. राष्ट्रवादीच्या (Ncp) एका बड्या नेत्याला लवकरच अटक होणाराय.  हे आम्ही म्हणत नाही. ही भविष्यवाणी केलीय भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी.  राष्ट्रवादीचा तो बडा नेता कोण? कंबोज यांची भविष्यवाणी खरी ठरणार का? पाहूयात हा खास रिपोर्ट. (bjp leader mohit kamboj tweet series about ncp leader)

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. मात्र विधानभवनाऐवजी बाहेरच मोठी राजकीय खळबळ उडालीय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एकापाठोपाठ एक पाच ट्विट करून स्फोटक भविष्यवाणी केली. 

हे ट्विट जपून ठेवा. राष्ट्रवादीचा एक बडा-बडा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. 

2019 मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याचा तपास थांबवला. सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हायला हवी, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारं ट्विट देखील त्यांनी केलं. 

हर हर महादेव..! अब तांडव होगा !
असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

1) अनिल देशमुख
2) नवाब मलिक
3) संजय पांडे
4) संजय राऊत
5) ......................

माझा 100% स्ट्राईक रेट आहे, असा इशारा देऊन कंबोज यांनी विरोधकांचे धाबे दणाणून सोडलेत. 

राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ईडीच्या कोठडीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये आहेत. 

या सर्वांना अटक होणार असल्याचं भाकीत कंबोज यांनी अटकेआधीच केलं होतं. त्यामुळं आता पाचवा नंबर कुणाचा? याची चर्चा सुरू झालीय. भाजपनंही कंबोज यांचा दावा उचलून धरताना, त्यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के असल्याची आठवण करून दिलीय. 

दरम्यान, मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे, अशी टीका करतानाच त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केलीय.  सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा पर्दाफाश करण्यासाठी कंबोज लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. 

या नेत्याची भारतातली आणि भारताबाहेरची बेनामी मालमत्ता, बेनामी कंपन्या, गर्लफ्रेंडच्या नावावर असलेली मालमत्ता, मंत्री म्हणून केलेला भ्रष्टाचार आणि त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि मालमत्ता अशा सगळ्या बाबींचा गौप्यस्फोट करण्याची धमकी देखील कंबोज यांनी दिलीय. आता ही धमकी ते कधी खरी करून दाखवणार, याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.