मुंबई पालिकेअंतर्गत नोकरी आणि 75 हजारपर्यंत पगार; थेट मुलाखतीतून होणार निवड

BMC Recruitment:  मुंबई पालिकेच्या या भरतीअंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 22, 2024, 03:25 PM IST
मुंबई पालिकेअंतर्गत नोकरी आणि 75 हजारपर्यंत पगार; थेट मुलाखतीतून होणार निवड title=
BMC Recruitment 2024
BMC Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.या पदासाठी उमेदवारांची निवड थेट भरतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या या भरतीअंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. 

पदभरतीचा तपशील

सल्लागारची 4 रिक्त पदे भरली जाणार असून पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एम.बी.बी.एस, एम.डी (पीएसएम) करणे आवश्यक आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 73 हजार 500 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. बालरोग तज्ञची 4 पदे भरली जाणार असून उमेदवाराकडे एम.बी.बी.एस, एम.डी (बालरोग) पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. मानसोपचार तज्ञच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून एम.बी.बी.एस, एम.डी (बालरोग) ची पदवी पूर्ण केलेली असावी. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 75 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयकची 4 रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवारांनी एम.बी.बी.एस किंवा कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी घेतलेली असावी. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकची 2 रिक्त पदे भरली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एम.बी.बी.एस किंव कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी पूर्ण केलेली असावी. 

Mumbai Job: मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

 

कुठे, कधी होणार मुलाखत?

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षे इतकी आहे. मागासर्गीयांनसाठी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांपर्यंतची सवलत देण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यू.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ बाबासाहेब रोड परेल या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 23 जुलै रोजी या मुलाखती पार पडणार आहे.

मुंबई मेट्रोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी हवीय? 'येथे' पाठवा अर्ज