फेसबुक फ्रेंडलिस्ट बघून ही कंपनी देतेय लोन

 फेसबुकवर जास्त मित्र असणाऱ्यांचा एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. पण अशा मंडळीना आता लोन मिळणेही सोपे झाले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2017, 04:17 PM IST
फेसबुक फ्रेंडलिस्ट बघून ही कंपनी देतेय लोन  title=

मुंबई :  फेसबुकवर जास्त मित्र असणाऱ्यांचा एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. पण अशा मंडळीना आता लोन मिळणेही सोपे झाले आहे.

मुंबईतील CASHe नावाची ही स्टार्टअप कंपनी लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या उधारी चुकती करण्याचे आकलन त्याची फेसबुक फ्रेंडलिस्ट बघून करत आहे. मोबाईलचा वापर, मोबाईल फोन वरील कॉंटॅक्ट्सची संख्या, वापरत असलेले मोबाईल अॅप्स, ई-कॉमर्सचा वापर करण्याची फ्रिक्वेन्सी ही पाहीली जात आहे. स्टार्टअप लोपन देताना तुमची सोशल मीडियातील अॅक्टिव्हिटी पाहिली जाते.

लोन घेण्याची प्रक्रिया 

-अल्टरनेट लॅंडिंग बिझनेसशी निगडित या कंपनीची सुरूवात २०१६ मध्ये झाली. यांनी आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा फंड व्यवसाय केला आहे.

-हे अॅप 'गुगल प्लेस्टोअर' आणि 'अॅपल'वरही उपलब्ध आहे. पाच सोप्या स्टेप्सनंतर हे लोन तुम्हाला मिळते.

-'लोन वन कॅपिटल' नावाच्या फायनान्स कंपनीकडून (NBFC) लोन उपलब्ध करुन दिले जाते.