मध्य रेल्वेचा आज जंबो ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

आज मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते कसारा मार्गावर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. आंबिवली रेल्वे स्थानकात भारतीय लष्करातर्फे पादचारी पूल बांधण्याचं काम सुरू आहे. 

Updated: Jan 18, 2018, 10:23 AM IST
मध्य रेल्वेचा आज जंबो ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल title=

मुंबई : आज मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते कसारा मार्गावर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. आंबिवली रेल्वे स्थानकात भारतीय लष्करातर्फे पादचारी पूल बांधण्याचं काम सुरू आहे. 

याच कामासाठी आज सकाळी पावणे दहा ते दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. यादरम्यान लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. या ब्लॉक दरम्यान एसटी महामंडळ आणि केडीएमसीतर्फे विशेष बससेवा चालवण्यात येणार आहे.

मात्र उद्या वर्किंग डे असल्याने कसारा, टिटवाळा,आसनगाव परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.