मुंबई : पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली होती. या गाड्या आजपासून आपल्या नेहमीच्या वेळेप्रमाणे धावू लागल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड येण्याचा तसेच कोसळण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे दरड बाजुला करण्यासाठी आणि कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई, पुणे प्रवास करणाऱ्यांना एसटीने प्रवास किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागल होता.
दरम्यान, पावसामुळे आणि दरडी कोसळण्यामुळे मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेने या तारखेत पुन्हा वाढ करत १५ तारखेपर्यंत ही सेवा बंद होती. त्यामुळे मुंबई - पुणे आणि पुणे - मुंबई असा तसेच अन्य ठिकाणी रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. तर दुसरीकडे एसटीची सेवा व्यवस्थित नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आजपासून रेल्वेची सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Following Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route.
11010 Pune-Mumbai Sinhagad Exp
11009 Mumbai-Pune Sinhagad Exp
12123 Mumbai-Pune Deccan Queen
12128 Pune-Mumbai Intercity Exp
22106 Pune-Mumbai Indrayani Exp@drmmumbaicr @drmpune— Central Railway (@Central_Railway) August 15, 2019
डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आता १६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार होत्या. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने तसेच दरड बाजुला करण्याचे काम पूर्ण झाल्याने आजपासून डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्या सुरु करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाड्या रद्द करण्यात आल्याच रेल्वेकडून सांगण्यात आले होते.
अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात तसेच मिरज-लोंडा (कर्नाटक) विभागात लोहमार्गावर पाणी येऊन ते खचले होते. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अन्य लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.