काँग्रेस - राष्ट्रवादी जागा वाटप चर्चेचं घोडं अडलं

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची परिस्थिती जैसे थे आहे. आज दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली.

Updated: Nov 2, 2018, 06:52 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादी जागा वाटप चर्चेचं घोडं अडलं title=

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची परिस्थिती जैसे थे आहे. आज दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली. ४० जागांवर यापूर्वीच एकमत झालंय. मात्र ८ जागांवर चर्चेचं घोडं अडलंय. चार जागा मित्रपक्षांसाठी सोडणं आणि ४ जागांची आदलाबदली यावर आजच्या बैठकीतही निर्णय होऊ शकला नाही. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्यामध्ये आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागावाटपाची चर्चा झाली. पुढील चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार आज बैठक झाली. मात्र, जागा वाटपाबाबत चर्चा थांबली. दावा केलेल्या आठ जागांचा तिढा सुटत नाही, त्यामुळे चर्चा थांबलेय. दरम्यान, आघाडी व्हावी यासाठी सकारात्मक चर्चा आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ऑक्टोबरमध्ये दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली. उत्तर-मध्य मुंबईतून लढण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त इच्छूक आहेत. तर काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा मागितली. तसेच यावेळी जागावाटपाचे सूत्र ५०-५० असे ठेवण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली. मात्र, जागांचा तिढा सुटत नसल्याने चर्चा थांबलेय.