मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज दिले. संशयितांना Home Quarantine मधून पळून जात असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. तसेच राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील प्रमुख महानगरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, असे आवाहन केले आहे. जर कोणी या बंद काळात घरातून बाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसला तर त्याच्यावर पोलीस कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Coronavirus Crisis । Janata Curfew । कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या आणि घराबाहेर न पडता दुसऱ्यांचीही घ्या । २४ तास डॉट कॉमचे कळकळीचे आवाहन, उद्या जनता कर्फ्यू असून घरीच राहा#Corona #Coronavirus #Covid_19 @ashish_jadhao #CoronaVirusinMaharashtra pic.twitter.com/VeiGMMzSPh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत अशांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड येथे अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्यांना पोलिसांनी समज दिली आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून कोणी आले तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनीही सहकार्य़ करण्याचे आवाहन केले आहे.
#BreakingNews । महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट । वसई औद्योगिक वसाहत पूर्णपणे बंद । ३१ मार्चपर्यंत कंपन्या बंद करण्याबाबत निर्णय जाहीर । १० हजार कंपन्यामधील ८० हजार कामगार सहकार्य करणार#Corona #Coronavirus #Covid_19 @ashish_jadhao #Maharashtra #maharashtralockdown @CMOMaharashtra pic.twitter.com/10LO5EyggZ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचे आदेश आहेत. त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले.