मुंबई : देशभरात कोरोनाचं संकट उद्भवलं आहे. राज्य सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वतोपरी पर्यत्न करत असताना मात्र भाजप नेते यावर शंका घेत आहे. विरोधी पक्षनेते अधूनमधून राजभवनावर जातात व सरकार कोरोनासंदर्भात ढिले पडले अशी तक्रार करत आहेत. यावर शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. एवढंच नव्हे तर राज्यपाल अजूनही भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत असल्याची टीका देखील केली आहे.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्यांवर टीका कली आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सगळेच मनापासून मैदानात उतरले आहेत. जोखीम घेऊन लढत आहेत. कोरोनामुळे केंद्र आणि राज्यांमधील पक्षीय मतभेदाच्या भिंती तुटून पडल्या आहेत. जे कोणी कोरोनाचा संकटाचे राजकारण करू इच्छितात त्यांचे राजकारण जनताच चुलीत टाकेल असे सध्या वातावरण आहे. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' प्रकरणामुळे नाराज)
कोरोनाविरूद्धची लढाई साधी नाही. राज्यव्यवस्थेतील प्रत्येक घटक त्यात सहभागी झाला आहे. राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधानांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपासून राजभवनांपर्यंत प्रत्येकानेच या लढ्यात उतरायचे आहे. कोरोनाबरोबरच्या लढाईत आपले योगदान हवं असे सगळ्यांनाच वाटते. मग आमच्या राज्यपालांना तसे वाटले व त्यांनी राजभवनात बसून प्रशासकीय यंत्रणा राबविली (परस्पर) म्हणून टीकेचा सूर ठोकला आहे.