फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौऱ्यावर; तहाची चर्चा लांबणीवर?

या चर्चेसाठी स्वत: देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार असल्याची माहिती काल समोर आली होती.

Updated: Nov 3, 2019, 08:48 AM IST
फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौऱ्यावर; तहाची चर्चा लांबणीवर?  title=

मुंबई: राज्यामध्ये सत्तास्थापनेवरून गोंधळ सुरू असताना शिवसेना आणि भाजपमधील नेते रविवारी अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यामध्ये दौरा करणार आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. त्यामुळे या दोघांमधील चर्चा लांबवणीवर पडली आहे. परिणामी अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये विसंवाद असल्याचे दिसत आहे.

शिवसेना आणि भाजपमधील वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार असल्याची माहिती शनिवारी समोर आली होती. दोन दिवसांत फडणवीस  उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून किंवा त्यांना भेटून चर्चा करतील, असे सांगण्यात आले होते. दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना हा तिढा सोडवण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही परिस्थितीत युती ही भक्कम राहिलीच पाहिजे. शिवसेना-भाजपमधील सध्याच्या वातावरणामुळे विरोधकांचे फावू शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव यांच्याशीच चर्चा करावी. २०१४ मध्ये भाजपने प्रथम सरकार स्थापन केले होते. त्यानंतर शिवसेना त्यामध्ये सहभागी झाली होती. मात्र, यंदा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन झाले पाहिजे, असा सूचना देवेंद्र यांना दिल्लीतून देण्यात आल्याचे कळते. शिवसेनेच्या गोटातूनही अशाप्रकारची चर्चा होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला होता. मात्र, आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या दौऱ्यांवर रवाना होणार असल्याने ही चर्चा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

शरद पवार सोनिया गांधींना भेटणार

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. राज्यातील बोलणी पूर्ण झाल्यावरच अमित शाह मुंबईत येणार असल्याचे समजते.

...तर मंत्रिमंडळात 'ईडी'चा एक प्रतिनिधी सामील करावा लागेल- संजय राऊत

विधिमंडळात शपथविधी सोहळ्याची लगबग सुरु

एकीकडे पूर्ण बहुमत मिळालेल्या सेना-भाजपकडुन सत्ता स्थापन कधी केली जाणार याचा पत्ता नसताना विधिमंडळात विशेष अधिवेशनाची तयारी मसुरू झाली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी, विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आणि विरोधीपक्षनेते याची निवड करण्यासाठी विशेष अधिवेशन भरवले जाणार आहे.