मुंबई : ED Raids at 10 Places in Mumbai : कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम संबंधित व्यक्तींवर ईडीचे आज छापे मारले. या छापेमारीच्यावेळी एका व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतले आहे. हसीना पारकर हिच्या घराच्या परिसरात ईडीचे छापेमारी केली आहे. एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीचे छापे मारले आहेत.
NIA ने दाऊद इब्राहिम याच्यावर गुन्हे दाखल केल्यावर त्याआधारे आता ईडीने छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत आज ईडीने 10 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. हवाला, मनी लाँडरिंग, ड्रग तस्करी या संबंधी हे छापे मारण्यात आलेत. दाऊदच्या निकटवर्तीयांवर हे छापे मारण्यात आलेत. पहाटे चार वाजल्यापासून ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकले. एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ईडीने नक्की कोणत्या मालमत्तांवर छापे मारले याची माहिती मिळू शकलेला नाही. परंतु, कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपासयंत्रणेने (NIA) गेल्या आठवड्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.