मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच उद्या मुंबईत जोरदार स्वागत होणार आहे. सकाळी एअरपोर्टवर भाजपचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पोहचणार आहेत. मुंबई एअरपोर्ट ते भाजप कार्यालय येथे सर्व आमदारांचा ताफा फडणवीसांच्या स्वागतासाठी पोहोचणार आहे. (Welcome of Devendra Fadnavis for victory in Goa Elections)
भाजपचे 106 आमदार भाजपला गोव्यात मिळालेल्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचणार आहेत. विधानसभेचं अधिवेशन सुरु असल्याने सर्व आमदार मुंबईतच आहेत. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार यावेळी एअरपोर्टवर पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप कार्यालयात भाजपच्या विजयाचा उत्सव साजरा होणार आहे. सकाळी 8:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचं एअरपोर्टवर आगमन होणार आहे.
भाजपने 5 पैकी 4 राज्यांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. पण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपकडे बहुमत असल्याने त्यांचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.