मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वेवर लोकलच्या 100 फेऱ्या वाढण्याची शक्यता

Mumbai local News : मध्य रेल्वेवर 100 उपनगरी लोकल सेवा वाढण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 22, 2021, 09:27 AM IST
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वेवर लोकलच्या 100 फेऱ्या वाढण्याची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता असून गर्दीवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे. (Mumbai local train update) मध्य रेल्वेवर 100 उपनगरी लोकल सेवा वाढण्याची शक्यता आहे. ठाणे ते दिवा दरम्यान गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम जानेवारीत पूर्ण झाल्यावर लोकल फेऱ्या वाढणार आहेत. (Good news for Mumbaikars, possibility of increasing 100 local trains on Central Railway)

नवे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गामुळे थ्रू ट्रेनचा अडथळा फेब्रुवारीत पूर्ण होईल. मध्य रेल्वेवर सध्या 1750 लोकल फेऱ्या होतात. त्यात 100 फेऱ्यांची वाढ होईल. थ्रू ट्रेन्ससाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असल्याने वेळापत्रकात मोठे बदल होतील. 

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वे (WR) झोनने  मुंबईतील उपनगरीय सेवा 100 टक्के क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या, CR आणि WR CR आणि WR च्या मुंबई विभागात अनुक्रमे 1702 आणि 1304 उपनगरी सेवा चालवत आहेत जे त्यांच्या एकूण उपनगरी सेवांच्या 95.70 टक्के आहे. लोकल गाड्यांमधील प्रवाशांचा वाढता प्रवाह लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.