मी अयोध्येत 25 नोव्हेंबरला जाणार - उद्धव ठाकरे

निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल. तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बताये़गे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा.- उद्धव

Updated: Oct 18, 2018, 08:31 PM IST
मी अयोध्येत 25 नोव्हेंबरला जाणार - उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाणार असल्याचे सांगून तारीखही जाहीर केली. त्यामुळे उद्धव अयोध्येत कधी जाणार यावर पडदा पडला आहे. मी राम मंदिरासाठी अयोध्येला जाणार आहे. येत्या 25 नोब्हेंबरला मी अयोध्येला जाणार आहे, असे उद्धव यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सष्ट केले.

निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल. तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बताये़गे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा. राष्ट्रपतीची निवडणूक येते तेव्हा बाबरी मशिदची केस येते. कारण लालकृष्ण आडवाणी राष्ट्रपती होतील.15 लाख जसे जुमला होता तसे जाहीर करा, राम मंदिर जुमला आहे. असे एकदा जाहीर करा. तुम्ही जगभर फिरताय, पण माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत का गेला नाही, असा थेट सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

ज्यांनी बाबरी पाडली त्यांच्या शौर्याचे कौतुक करा. मी राम मंदिरासाठी अयोध्येला जाणार आहे. येत्या 25 नोब्हेंबरला मी अयोध्येला जाणार, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले. मेळाव्याच्या दरम्यान जोरदार हवा सुटली. या हवेचा दाखला देत ही हिंदुत्वाची हवा आहे. तुम्ही मंदिर बांधता की आम्ही बांधू त्याचा फैसला करा. जर तुम्ही बांधत नसाल तर देशातील हिंदु एकत्र करून आम्ही राम मंदिर बांधू, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.

हे एनडीएचे सरकार नाही. सरकारमधून कधी बाहेर पडणार असे विचारले जाते, मी चेष्टा, टीका सहन करतोय ते केवळ हिंदुत्वासाठी. तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मित्र आणि म्हणाल तेव्हा शत्रू
. देशाच्या परराष्ट्र धोरणाला ना शेंडा ना बुडखा तरी 2019 ला आम्हीच सत्तेत येणार हे कशाच्या जोरावर सांगता. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेय. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेय. रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत घसरलाय. मोदींनी जी आश्वासने दिलीत. ती पूर्ण केलेली नाहीत. महागाईने सर्वसामान्य होरपळतोय. महिलांवर अत्याचार होत आहेत. आणि हे केवळ आश्वासन देत आहेत, अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरे यांनी केली.