राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Jayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 1, 2024, 02:13 PM IST
राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा title=
Jayant Patil will leave NCP

Jayant Patil : महाराष्ट्र राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी केलाय. जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावा सूरज चव्हाणांनी केलाय. सूरज चव्हाणांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. तर या निवडणुकीनंतर अजित पवार आणि शिंदे गट राहील की नाही हाच प्रश्न आहे. मात्र, हायकमांड निर्णय घेईल त्याचं समर्थन करू अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलीय.

निवडणूकपूर्वीही अशी चर्चा गेली होती की, राष्ट्रवादीचे जयंत पाटील पक्षाला रामराम करणार आहेत. त्यावेळी जयंत पाटील राष्ट्रवादीत का राहणार नाही याची दहा कारणं भाजपने दिली होती. भाजपने यासंदर्भात एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला होता. 

सुरज चव्हाण काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. तर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच सूरज चव्हाण यांच्या दावामुळे एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांची साथ होणार आहे, असा दावा केलाय. सूरज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा काँग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली असून त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे 4 जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा रिकामा होणार आहे. तिकडचे अनके लोक अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पक्षप्रवेश करतील असंही सुरज चव्हाण म्हणाले.

दुसरीकडे, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही सूरज चव्हाण यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय. जयंत पाटील हे यापूर्वीच भाजप किंवा काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भविष्य जयंत पाटील यांना माहित असल्याने ते काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात असं प्रवीण दरेकर म्हणाले. 

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनतर अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील यांनी मात्र एकनिष्ठेने शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आजही जयंत पाटील हेच शरद पवार गटाकडून किल्ला लढवताना पाहिला मिळतात. पण वेळोवेळी ते शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा रंगते त्यामुळे आता वेळच सांगेल नेमकं जयंत पाटील काय निर्णय घेणार आहे ते...