मुंबई महापालिकेच्या अशा अधिकाऱ्यांना सलाम

या अधिकाऱ्यांसमोर मराठी माणूस वैगरे असं काही नसतं, पैसावाला माणूस यांच्यासाठी मोठा असतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 29, 2017, 09:05 PM IST
मुंबई महापालिकेच्या अशा अधिकाऱ्यांना सलाम title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई :  बीएमसीचे काही अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईत तुम्हाला न आवडणारे आणि धक्कादायक प्रकार दिसतात, तेव्हा हे अधिकारी कोण आहेत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

मराठी माणूस नाही पैसावाला माणूस

या अधिकाऱ्यांसमोर मराठी माणूस वैगरे असं काही नसतं, पैसावाला माणूस यांच्यासाठी मोठा असतो.

परवानगीसाठी भरपूर त्रास

एका मित्राने बॉम्बे डाईंगसमोर हॉटेल टाकले, हॉटेल मराठी माणसाचं, तरीही त्याला परवानगीसाठी भरपूर त्रास झाला. दुकानाचं काम सुरू असताना, अगदी ५ मिनिटे एका कारागीराने काही अवजार फुटपाथवर ठेवली, ती देखील बीएमसीने उचलून नेली होती.

टॉवरचं गेट फुटपाथ अडवतं असं दिसतं...

बीएमसीच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता महान होती. पुढेच बॉम्बे डाईंगच्या समोर एका टॉवरचे दरवाजे फुटपाथवर उघडतात बाहेर, येथे स्मोकर्सची गर्दी असते, कुंड्या ठेवल्या आहेत. यामुळे लोकांना फुटपाथसोडून खाली चालावं लागतं. तेथे यांनी ही तप्तरता का दाखवली नाही.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? असा सवाल मनात येतो. टॉवरचे गेट बाहेर फुटपाथवर लोकांना आडवं येतं, त्यामुळे लोकांना फुटपाथ खालून वापरावं लागतं, हे अधिकाऱ्यांना दिसत नाही का?

कमला मिलमध्ये रेस्टॉरेट चालवायला विरोध नाही, पण निदान सर्व सुरक्षेचे नियम पाळले जावेत. हीच अपेक्षा...