झटक्यात प्रेम फटक्यात गेम, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रेम, भांडण आणि शिवीगाळ एकाच फटक्यात खेळ खल्लास, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं  

Updated: Aug 8, 2021, 04:02 PM IST
झटक्यात प्रेम फटक्यात गेम, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना title=

मुंबई: प्रेमसंबध आणि त्यातून होणाऱ्या हत्या असे अनेक प्रकार समोर येतात. मात्र एक चक्क तरुणाला प्रेमासाठी भांडण महागात पडलं आहे. त्याच्या जीवावर बेतलं आहे. ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. तरुणाने शिवीगाळ केल्याच्या रागातून 2 महिलांनी युवकाची हत्या केली. हा खळबळजनक प्रकार मुंबईच्या आर सी एफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

या प्रकरणात दोघा महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या कुटुंबातील एक तरुणीशी सुनील जांभूळकर या तरुणाचे पूर्वी प्रेमसंबध होते. हेच कारण त्यांचं भांडण विकोपाला जाण्याचं ठरलं. त्यांच्यातील वाद वाढला आणि तरुणानं दोघींना शिवीगाळ सुरू केला. सुनील चेंबूरच्या सहयाद्री नगर येथे आरोपींच्या घराजवळ आला असता त्यांची पुन्हा भांडणे झाली. 

या वेळी सुनीलने या महिलांना अश्लील शिव्या दिल्या. त्यावरून या दोन्ही महिलांनी त्याला एका घरात ओढत नेऊन त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर ओढणीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.

या हत्ये प्रकरणात करुणा ऊर्फ संतोषी माने आणि उषा माने या दोघींना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार या नणंद आणि भावजय आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास आर सी एफ पोलीस ठाणे करत आहेत.