हवामान | मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी गायब? कारण...

मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी आली आणि गायबही ... कारण

Updated: Dec 24, 2019, 10:44 AM IST
हवामान | मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी गायब? कारण... title=

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी आली आणि गायबही झाली. मुंबईत गेल्या दोन दिवसापांसून ढगाळ वातावरण आहे. किमान तापमानात चार अंशाची वाढ झालीय. यामुळं उकाडा वाढलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. यामुळं थंडीचे तीन तेरा वाजले आहेत.

मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या भागात आज आणि उद्या हलका पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना आणि परभणी या भागात उद्या हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. पूर्वेकड़ून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे.