मुंबई : मुंबईत कोरोना (Corona) रुग्णसंख्तेय चढ-उतार पाहिला मिळतोय. गेले तीन दिवस कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असताना आज पुन्हा एकदा मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे.
मुंबईत गेल्या चोवीस तासात 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
मुंबईत बरं झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के इतका आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 36 दिवसांवर आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.
मुंबईतील तारिखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420