मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी  तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 23, 2023, 09:28 AM IST
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या title=
Western Railway to operate night block

Mumbai Local Train News : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वेवर आज 23 जून रोजी रात्रीचा ब्लॉक असणार आहे. तसेच 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या मार्गावर  रविवारी मेगाब्लॉक असणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे की, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी जलद मार्गावर 23.50 ते 02.50 पर्यंत आणि डाऊन फास्टवर तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाईल. शुक्रवार, 23 जून आणि शनिवार, 24 जून, 2023 च्या मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान 01:30 ते 04:30 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 19101 विरार - भरुच मेमू ही गाडी 15 मिनिटे उशीराने सुटेल आणि विरारहून 04:35 तासांऐवजी 04:50 वाजता सुटेल. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यात बदल

तसेच रविवार, 25 जून 2023 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही ब्लॉक राहणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच दुसर्‍या एका निवेदनात, पश्चिम रेल्वेने म्हटले आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने, पश्चिम रेल्वेने विशेष चार गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे.

1. ट्रेन क्रमांक 04712 वांद्रे टर्मिनस - बिकानेर साप्ताहिक विशेष जी पूर्वी 25 जून 2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक 04711 बिकानेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक
विशेष जी यापूर्वी 24 जून 2023 या तारखेपर्यंत धावणार होती. आता या गाडीला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

2. ट्रेन क्रमांक 04714 वांद्रे टर्मिनस - बिकानेर साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 30 जून 2023 पर्यंत धावणार होती ती 29 सप्टेंबर 2023 पर्यंत तिची मुदत वाढवण्यात आली आहे.  

ट्रेन क्रमांक 04713 बिकानेर – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 29 जून 2023  पर्यंत धावणार होती.  ती 28 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

३. गाडी क्रमांक 09622 वांद्रे टर्मिनस – अजमेर साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 26 जून 2023 पर्यंत सुरु राहणार होती.  तीची फेरी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे
 
गाडी क्रमांक 09621 अजमेर – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 25 जून 2023 पर्यंत धावणार होती ती 24 सप्टेंबर 2023पर्यंत सुरु राहणार आहे.

4. ट्रेन क्रमांक 09724 वांद्रे टर्मिनस - जयपूर साप्ताहिक स्पेशल जी यापूर्वी 29 जून 2023 पर्यंत सुरु राहणार होती. ती 28 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 ट्रेन क्रमांक 09723 जयपूर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 28 जून 2023 पर्यंत धावणार होती. तिच्या फेरीत 27 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 04712, 04714, 09622 आणि 09724 च्या या गाड्यांचे आरक्षण आज  23 जून 2023 पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर करताना येणार आहे. तसेच गाड्यांच्या थांब्यांच्या वेळा आणि रचना यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.