Mumbais Rivers and Seas Clean: मुंबईतील समुद्रकिनारी विकेंडला मोठी गर्दी पाहायला मिळते. मरीन लाईन्स, गिरगाव चौपटी, वांद्र, वरळी, दादर चौपटी फिरण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यंटक येत असतात. समुद्रात खूप मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा किनाऱ्यावर आलेला दिसतो. नाले, जल प्रदूषणामुळे मुंबईतील नद्या गायब झाल्या आहेत. पण आता मुंबईतील समुद्र आणि नद्या चकाचक झालेल्या दिसल्या तर आश्चर्य मानायला नको. कारण मुंबईतील समुद्र आणि नद्या वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ केल्या जाणार आहेत. यासंबंधी नेदरलँडसोबत समंजस्य करार करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरातील नद्या तसेच समुद्रात प्लास्टिक आणि कचरा खूप मोठ्या प्रमाणात जातो. यामुळे यांच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न अनेक वर्षांपासून उभा आहे. राज्य सरकारने यावर उपाययोजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक प्रदूषण आणि कचरा कमी करण्यासाठी नेदरलँड आणि भारत क्लिन रिव्हर्स फाउंडेशन मुंबई यांच्याशी करार केला. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात महासागर स्वच्छतेच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. ओशन क्लिनअप ही कंपनी मुंबईतील नद्या आणि समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषणाची साफसफाई करणार आहे.
मुंबईतील समुद्र आणि नद्यांतील प्रदूषणाचा प्रभाव कमी केला जाणार आहे. नदीतील प्लास्टिक रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच समुद्रामध्ये अगोदर जमा झालेले प्लास्टिक काढून समुद्र स्वच्छ करणे हे अशोन क्लिनअपचे उद्दिष्ट आहे. यातून एक मॉडेल बनवण्यात सरकारचा मानस आहे. या कामाला सुरुवात झाली असून पहिला प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात आला आहे.प्लास्टिक क्लिन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने काम केले जाणार आहे.मुंबई पालिकेसह इतर पालिकांना लागणारी मदत सरकारकडून केली जाणार आहे. कचरा कुठून येतो? कुठे जातो? याच ट्रॅकिंग केले जाणार आहे.
समुद्रात कचरा जायला सहा महिने लागतात तर नदीच्या पात्रात तो दहा वेळा वर खाली होतो.मुंबईच्या नद्या आणि मुंबईतील परिसराला याचा खूप मोठा फायदा होईल आणि स्वरूप बदलेल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासंदर्भात प्रदूषण महामंडळाला काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. स्वच्छ महासागराकडे नेणाऱ्या स्वच्छ नद्या पाण्याच्या आसपास राहणाऱ्या समुदायांना पर्यटन आणि शाश्वत मासेमारी याच्यासह अनेक विविध मार्गांसाठी लाभदायी ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.