Shehzada actor Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपल्या नवीन चित्रपट 'शेहजादा' (Shehzada) साठी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. परंतु नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केल्यामुळे कार्तिक अडचणीत आला. चुकीच्या बाजूला कार पार्क केल्याबद्दल मुंबई वाहतूक पोलिसांनी कार्तिकला चालान बजावले आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनसाठी 2022 हे वर्ष खास ठरले. त्यातच यावर्षी 'शहजादा' (Shehzada) चित्रपट प्रदर्शित झाला असून यामुळे कार्तिक विशेष चर्चेत आहे. तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. दरम्यान 'शहजादा'च्या रिलीजनंतर कार्तिक आर्यनने 17 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. कार्तिक सिद्धिविनायक मंदिराजवळ (Siddhivinayak Temple) पोहोचताच पापाराझींची नजर त्याच्यावर पडली. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कॅमेऱ्यासमोर सर्वांना हात जोडत तो मंदिराबाहेर पडत होता. नव्या सिनेमाला यश मिळावे याकरता आशिर्वाद घेण्यासाठी कार्तिक सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. यावेळी कार्तिकला कायदेशीर बाबींचा सामना करावा लागला. त्याची लग्झरी गाडी अभिनेत्याने चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने चालान भरावा लागला.
वाचा: तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...
यावेळी मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) त्यांच्या हटके स्टाइलमध्ये ट्वीट करत कार्तिकला चालान का भरावे लागले याचे कारण सांगितले. त्यांनी कार्तिकच्याच एका संवादाची स्टाइल वापरत लिहिले की, 'प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा आहे की गाडी चुकीच्या जागी पार्क करण्यात आली होती. 'शहजादा' ट्राफिकचे नियम मोडू शकतो अशी 'भूल' करू नका.' #RulesAajKalAndForever असा हॅशटॅगही मुंबई पोलिसांनी वापरला.
Problem? Problem yeh thi ki the car was parked on the wrong side!
Don't do the 'Bhool' of thinking that 'Shehzadaas' can flout traffic rules. #RulesAajKalAndForever pic.twitter.com/zrokch9rHl— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 18, 2023
'प्यार का पंचनामा' सारख्या विनोदी मनोरंजनात्मक चित्रपटांपासून ते तीव्र थ्रिलर 'धमाका' पर्यंत, कार्तिकने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या शैलींमध्ये जबरदस्त कामगिरी बजावली आहे. 'प्यार का पंचनामा' मधील त्याचा 5 मिनिटांचा एकपात्री अभिनय व्हायरल झाला होता. त्यानंतर कार्तिक प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 'भूल भुलैया 2' हा बॉलीवूड चित्रपटांपैकी एक होता ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.