मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का

Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2024, 10:23 AM IST
मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का title=
Mumbaikars have exhausted crores of rupees of water supply will be shocked to hear the figure of private societies bmc in water bills mumbai

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील पाणीपट्टीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी मुंबई महापालिकेची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. खाजगी सोसायट्यांसह केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे आणि कंपन्यांचा समावेश आहे. या थकत पाणीपट्टीमुळे मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 3,320 कोटी 08 लाख रुपयांवर पोहोचल्याचे समोर आलं आहे. (Mumbaikars have exhausted crores of rupees of water supply will be shocked to hear the figure of private societies bmc in water bills mumbai)

कोणी किती कोटी पाणीपट्टी थकवले?

बेस्ट – 21.57 कोटी
मुंबई महापालिका – 35.44 कोटी
मुंबई पोर्ट ट्रस्ट – 73.97 कोटी
केंद्र सरकार – 71.02 कोटी 
मध्य रेल्वे – 208.56 कोटी 
म्हाडा – 443.11 कोटी
एमएमआरडीए – 15.80 कोटी
अन्य – 43.50 कोटी
खासगी सोसायट्या – 1885.20 कोटी
राज्य सरकार – 196.17 कोटी 
पश्चिम रेल्वे – 325.74 कोटी 
एकूण – 3320.08 कोटी