मुंबईतील केईएम रुग्णालयात आता व्यापक पक्षाघात उपचार केंद्र

के. ई. एम. रुग्णालयातील मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागातील व्यापक पक्षाघात उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा 

Updated: Oct 10, 2018, 08:05 PM IST
मुंबईतील केईएम रुग्णालयात आता व्यापक पक्षाघात उपचार केंद्र title=

मुंबई : महापालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयातील मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागातील व्यापक पक्षाघात उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित झाला. ८.५ कोटी रूपये किंमतीच्या नव्या अत्याधुनिक मशिनमुळं पक्षाघात म्हणजे स्ट्रोक आलेल्या रूग्णांवर तात्काळ उपचार होण्यास मदत होणार आहे. 

केईएम रूग्णालयात रोज ६ ते ८ रूग्ण पक्षाघाताचे येतात. तर महिन्याला ही संख्या १८० ते २०० वर जाते. या उपचार केंद्रामुळं रूग्णांचे जीव वाचण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.