मुंबई : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशनसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलंय.
या अॅपमुळे पोलीस व्हेरिफिकेशन फक्त तीन दिवसात करता येणार नाही. पासपोर्टची सगळी प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे आधीच लागणारा अवधी कमी झाला होता. त्यात पोलीस व्हेरिफिकेशनही ऑनलाईन झाल्यामुळे प्रक्रिया आणखी सुकर आणि जलद होणार आहे.
पासपोर्ट जारी करण्याच्या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने सुटसुटीत पद्धत अवलंबली आहे. प्रथमच पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी जास्तीच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. तुम्ही अर्ज केल्यानंतर पोलीस सत्यता तपासण्यासाठी आता अॅपचा आधार घेतला जाणार आहे. या अॅपद्वारे पोलीस माहिती घेऊन तुमच्या पत्त्यावर घरी येतील.
नवीन नियमांप्रमाणे, पासपोर्ट कार्यालय प्राधान्यक्रमानुसार सामान्य पासपोर्ट जारी करेल आणि नंतरच्या तारखेसाठी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी करतील. त्यानंतर आपण आपल्या अखत्यारीत कोणताही गुन्हेगारी खटले नसल्याचे शपथ घेऊन प्रतिज्ञापत्राद्वारे आधार, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या प्रतीसह अर्ज सादर केले तर पासपोर्ट ऑफिस तुम्हाला एक पासपोर्ट जारी करेल.