शाळेबाबत महत्वाची बातमी, ठरलं उद्यापासून शाळा सुरु

Mumbai School News : ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे शाळा (School) सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र शाळा...

Updated: Dec 14, 2021, 11:21 AM IST
शाळेबाबत महत्वाची बातमी, ठरलं उद्यापासून शाळा सुरु title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai School News : ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे शाळा (School) सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र शाळा सुरु होण्याबाबतची ही महत्वाची बातमी. मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणार आहेत.  शाळेबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये, असे मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी 'झी 24 तास'ला माहिती दिली आहे.

मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार आहेत. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाळांकडून सूचना न मिळाल्याने पालक संभ्रमात आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनमुळे पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार आहे. शाळा नवीन वर्षात सुरु करण्यात याव्यात, अशी त्यांनी मागणी केली होती.

उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेने तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. तर, पालकांच्या मनातही ओमायक्रॉनविषयी भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणार, शाळेबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये, असे मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले आहे.